--------------- -------------- --------------------------------------------------- --------------------------------------------------- -------------------------------- ------------------------------- सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.

ISI प्रमुखांना भारताचे आमंत्रण.

"भारताचे पंतप्रधान माननीय मनमोहनसिंग यांनी पाकिस्तानी राष्ट्राध्यक्षांना फोन करुन ISI प्रमुखांना भारतात पाठवायला सांगीतले."
आचार्य अत्रे असते तर त्यांनी असा विनोद गेल्या १०००० वर्षात झाला नाही आणि पुढील १०००० वर्षात होणार नाही अशी प्रतिक्रीया दिली असती.
काय चाललय हे गेली दोन दिवस मुंबईत ?
सर्व बातम्यांचे चॅनल्स सर्व काही उघड दाखवत आहेत. अतिरेक्यांना NSG च्या सर्व हालचाली दाखवल्या जाताहेत. अशी बातम्यांची चॅनल्सना लगेच कायमची बंद करायला हवित.
कुठे आहे सरकार ?
याच बातम्यांमध्ये बर्‍याच अफवा पसरवल्या जाताहेत. याचा परिणाम मुंबईवर काय होतोय याचा कोण विचार करणार ?
फक्त वोट बॅंकेवरच अजुनही डोळा ?
सर्वांनी ठरवून अशा सरकारला पुढील निवडणुकीत घरचा रस्ता दाखवायला हवा.

मुंबईवर अतिरेकी हल्ला.

काला रात्री पासुनचा मुंबईवरचा हल्ला बघून चिड येत आहे,
आम्ही आमचे काही मोहरे गमावून बसलो. आज घरी बसणार व उद्या परत कामावर, परवाची वाट बघत.
कधी पर्यंत असेच चालणार ?
गरज आहे पेटून उठायची या राजकारण्यां विरुद्ध.
साधा निषेध पुरेसा नाही.
उद्या तो अमर, लालू व सोनिया व असेच काही राजकारणी त्यांच्या भावंडांना का मारलं अस विचारण्या पुर्वीच व याची चौकशी करण्यात यावी हे म्हणण्या आधीच सांगुन टाकूया यांना घरी बसा अन्यथा पुढील निवडणुका आमच्या हातात आहेत.
असल्या राजकारण्यांना परत परत निवडून देणे म्हणजे अपमान आहे त्या शहिदांचा ज्यांनी या देशासाठी आपले प्राण वेचलेत.
करणार का त्यांचा अपमान वारंवार ?

व्यवसाय वाढवायचा मार्ग !

तरुण : नमस्कार अबक कॉम्प्यूटर्स ?
पलिकडून : हो, अबक कॉम्प्यूटर्स. बोला काय झालं ?
तरुण : माझा प्रिंटर खराब झाला आहे. तुम्ही दुरुस्त कराल काय ?
फोन : हो, आम्ही करतो. दुरुस्तीचे आम्ही ३०० रुपये घेतो पण तुम्ही अस करा सोबत दिलेल पुस्तक वाचून तो तुम्हीच दुरुस्त करायचा प्रयत्न करा, नाही झाला तर आम्ही करुच.
तरुण : काहो अस केल्याने तुमचा मालक तुम्हाला काढून टाकेल ना कामावरुन. तुम्ही त्याचा धंदा कमी का करता ?
फोन : नाही तस नाही. हे मालकांचच सांगण आहे. तस केल्याने आम्हाला दुरुस्तीचे जास्त पैसे मिळतात.

एप्रिल फूल !

सांता एक एप्रिलला बस मध्ये चढला.
थोड्या वेळाने कंडक्टर आला व तिकीट विचारू लागला.
सांताने त्याला दहा रुपयाची नोट दिली व तिकीट घेतले, आणि जोरात ओरडला "एप्रिल फूल".
हे बघा माझ्याकडे पास आहे.

रामायण.

हवालदार जेलरला : साहेब, काल सगळे कैदी रामायण करत होते.
जेलर : व्वा छान सुधारताहेत तर आपले कैदी.
हवालदार : नाही साहेब.
जेलर : नाही ? काय झाले.
हवालदार : साहेब, हनुमान झालेला कैदी काल संजीवनी बुटी आणायला गेला होता. तो आतापर्यंत परत आलेला नाही.

फोनच बील.

फोनच बील फार जास्त आल्यावर श्री. देसाईंनी सकाळी नाश्त्याला सगळे बसले असताना विषय काढला की फोनच बील एवढ कां ? मी तर सगळे फोन ऑफिस मध्ये असतांनाच करतो. एवढ मोठ बील मला परवडत नाही.
सौ. देसाई : मी पण सगळे फोन माझ्या कार्यालयातुनच करते.
देसाईंचा मुलगा : मी घरुन कधिच फोन करित नाही. कंपनीने मला वेगळा फोन दिला आहे. मी तोच वापरतो.
देसाईंची मोलकरिण : त्यात काय बिघडलं ? आपण सगळेच आपल्या कामाच्या ठिकाणचेच फोन वापरतोनां ?

गाढव.

एकदा एका शाळेतल्या व्रात्य मुलांनी शाळेत काहीतरी मस्ती करायची ठरवले.
बर्‍याच विचारांती त्यांनी तीन गाढव आणले व त्यांच्या पाठीवर १, २ व ४ हे क्रमांक घातले व त्यांना शाळेच्या मैदानात सोडून दिले.
मुख्याधापकांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी शाळेतले सर्व कर्मचारी गाढव क्रमांक ३ शोधायला दिवसभर राबवले.

खडे

पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ?  पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...