--------------- -------------- --------------------------------------------------- --------------------------------------------------- -------------------------------- ------------------------------- सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.: सर्वोत्तम मराठी विनोद
सर्वोत्तम मराठी विनोद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सर्वोत्तम मराठी विनोद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

चिंता !

लग्नात  कुवारे...

आणी

अंतयात्रेत म्हातारे...
.
सर्वात जास्त का जातात कारण...
.
.
दोघांना एकाच गोष्टींची चिंता असते...
.
.
.
.
.
.
मी नाही जाणार तर,
माझ्या वेळी कोण येणार... !!!

स्वप्न !

काळू : माझे स्वप्न आहे मी माझ्या वडिलांसारखच महिन्याला ५००००० रुपये कमवावेत.

बाळू : तुझे बाबा महिन्याला ५००००० रुपये कमावतात ?








काळू : नाही रे, त्यांचही स्वप्न आहे कि महिन्याला ५००००० रुपये कमवावेत !

पत्ता !

झम्प्या एका सुंदर मुलीला विचारतो तुम्ही कुठे राहता?


मुलगी : एम. जी. रोड


झम्प्या : एवढ्या सुंदर असून तुम्ही रस्त्यावर राहता......!!!

गैरसमज !

बायको : काल तुम्ही मला झोपेत शिव्या देत होता.

नवरा : नाही ग.

बायको : हो, मी ऎकल्या. तुम्ही झोपेत मलाच शिव्या देत होता.

नवरा : तुझा गैरसमज आहे.

बायको : काय, कोणता गैरसमज ?

नवरा : मी झोपलो होतो.

वत्सला काकुंचा विमान प्रवास !

वत्सलाकाकू वयाच्या सत्तराव्या वर्षी प्रथमच विमान प्रवास करित होत्या. त्यामुळे त्या बर्‍याच अस्वस्थ होत्या. विमानात चढल्यावर त्या पायलटला भेटल्या व म्हणाल्या,"अरे मला सुखरुप परत उतरवशिल ना ?"


पायलट म्हणाला, "खर सांगु का आजी. मी पंधरा वर्षे विमान चालवत आहे. पण अजुन कुणाला आकाशात सोडून आलो नाही."

श्रमदान.

सांता : अरे बांता इतके दिवस कुठे गेला होतास ?

बांता : अरे मी श्रमदान करायला गेलो होते.

सांता : श्रमदान ? कुठे ?

बांता : जेल मधे . अरे मला सहा महिने सश्रम कारावास झाला होता ना.

नकार.

"तु माझ्याशी लग्न करायला तयार आहेस का ?" मंगेश.

साधना,"मी तुला या अगोदरच सांगितले आहे. मी तयार नाही."

"मी दोन दिवस वाट बघतो. अन्यथा मी विहार लेक मधिल बर्फात मधोमध एक भोक करणार व त्यात स्वत:ला बुडवून घेणार." मंगेश.

साधना,"अरे, मुंबईत इतकी थंडी कधिच नसते कि विहार लेक मधिल पाण्याच बर्फ होईल."

"तर मी अशी थंडी पडायची वाट बघणार."

सेवानिवृत्ती.

३५ वर्षांच्या प्रदिर्घ सेवे नंतर बाळाभाऊ सेवानिवृत्त होणार होते. गेली २० वर्षे त्यांच्या कार्यालयाचे ते प्रमुख होते. शेवटच्या दिवशी त्यांनी आपल्या सर्व सहकार्‍यांना पार्टी द्यायचे ठरवले.
खाणे सुरु असताना बाळाभाऊंनी सर्वांना एक कोरा कागद दिला व सांगितले कुणीही भाषण करणार नाही, प्रत्येकाने आपल्या भावना त्या कागदावरच लिहायच्या आहेत.

प्रत्येकाने त्यावर आपल्या साहेबांबद्दल लिहिणे सुरु केल.

एकाने लिहिल," साहेब आपण गेल्यावर आपले कार्यालय नेहमी सारखे वाटणार नाही."

दुसर्‍याने लिहील, " साहेब, मला काहीच सुचत नाहिये."

एक एक कागद वाचत बाळाभाऊ राजाभाऊंकडे गेले. म्हणाले राजा आपण गेली १८ वर्षे एकत्र आहोत, तुला काय वाटते रे.

लगेच राजाभाऊंनी लिहिल, " आज मला फार आनंद होत आहे, मी गेली पंधरा वर्षे या दिवसाची वाट बघत होतो ."

सिनेमा.

कायमच खेड्यात राहिलेले छगनराव एकदा शहरात आले.
घरी सर्वांनी एक सिनेमा बघायच ठरवल.
सिनेमा सुरु झाला, सर्वच मजा घेत होते.




आणि



सिनेमात एक वाघ प्रेक्षकांच्या दिशेने येत आहे असा सीन आला.
वाघ प्रेक्षकांकडे येत आहे हे बघुन छगनराव जोरजोरात किंचाळायला लागले.
छगनरावांना सांगण्यात आल घाबरु नका हा सिनेमा आहे.

छगनराव म्हणाले," होय, मला माहित आहे. पण त्या वाघाला माहित आहे का ?"

सुट्टी.

हिटलर एकदा एका ज्योतिषा कडे गेला व त्याला म्हणाल," मी कधि मरणार आहे ?"

ज्योतिषी: "सर, तुम्ही मराल त्या दिवशी ज्यु लोकांचा सुट्टीचा दिवस असेल."

हिटलर: "तुला कसे माहित तो सुट्टीचा दिवस असेल ?"

ज्योतिषी: " सर तुम्ही मराल त्या दिवशी आनंद साजरा करायला नक्कीच सुट्टी घेणार ना."

मरण.

चिंटू: बंटू, किती छान हॊईल ना जर आपल्याला कळले आपण कुठे मरणार आहे ते.

बंटू : तुला असे का वाटते ?

चिंटू: मला जर असे कळले तर मी त्या जागी कधिच जाणार नाही.

नविन वर्ष ठराव.

आज नविन वर्ष सुरु झाल. काल नविन वर्षाच्या संध्याकाळी सर्व पक्षातल्या प्रमुख नेत्यांची एक गुप्त बैठक झाली. सरत्या वर्षात गाजलेल्या घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक फारच शांतपणे झाली. सर्व नेत्यांनी नविन वर्षात सामंजस्याने वागायचे ठरवले व यापुढे एकमेकांवर २०१० मध्ये झालेली चिखलफेक न करण्याचे ठरवले.
बैठकीत काही महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली व बहुतेक ठराव एकमताने संमत करण्यात आले. ते मुद्दे खालील प्रमाणे आहेत.
१. नविन वर्षात कोणताही नविन घोटाळा करायचा नाही. सवयी मुळे एखादा घोटाळा झाल्यास त्यावर फार चर्चा न करता झालेला फायदा सर्वांनी सारखा वाटून घायचा.
२. कोणताही जूना मुद्दा या वर्षी उखरुन काढायचा नाही.
३. राष्ट्राच्या हिताचाच विचार मनात आणायचा. असा विचार मनात आणायला (सवय नसल्याने) बराच वेळ लागण्याची शक्यता आहे. तितका वेळ सर्वांनी शांतता पाळायची. हा कालावधी किती असावा यावर फार गंभीरपणे चर्चा झाली. बैठकीच्या शेवटी असा कोणताही कालावधी लगेच ठरवणे शक्य नसल्याने एक सर्व पक्षीय समिती स्थापुन तोडगा काढायचे ठरवण्यात आले आहे.

ही बैठक अतिशय गुप्त होती यात इतरही विषयांवर चर्चा झाल्याचे कळते. सर्व मुद्दे कळल्यावर वाचकांना कळवले जाईल.

डॉक्टर सांता.

डॉक्टर सांताने फार गंभीर चेहरा करुन हातात टॉर्च घेऊन पेशंटचे डोळे तपासले, जिभ बघितली, कान तपासले आणी.........












बराच विचार करुन म्हणाला..........












टॉर्च चांगला आहे !!!

लाच.

वकिल रागारागाने पक्षकाराकडे गेला.
वकिल : अरे तु आपल्या न्यायामूर्तींकडे लाच पाठवलीस ?
पक्षकार : होय.
वकिल : तुला माहित आहे ते कसे आहेत ? त्यांना हे आवडणार नाही.
पक्षकार : होय.
वकिल : तरिही तु अस का केलस ? आपण आता हरणार.
पक्षकार : नाही, मी लाच आपल्या विरोधी पक्षाच्या नावे पाठवली !!!

१००० पानांचे पुस्तक.

एक हजार पानांचे पुस्तक वाचायला किती वेळ लागेल ?


लेखक : सहा महिने.




डॉक्टर : दोन महिने.




वकिल : एक महिना.

अभियंता : परिक्षा कधि आहे ते सांगा. रात्रभरात वाचुन काढू.

१०० रुपयात ५०००० चे फटाक्याचा आनंद घ्या !

हि योजना सर्वांसाठी खुली आहे.
कृती:
१. बाजारात जा.
२. फटाक्यांच दुकान शोधा.
३. तेथून मोठा आवाज करणारे १०० रुपयांचे फटाके घ्या.
४. संध्याकाळी घरातील सर्वांनी मिळून विकत आणलेले फटाके. उडवा.
५. फटाके फोडताना होणारा आवाज रेकॉर्ड करा.
६. आपल्या CD प्लेयरवर तो आवाज मोठ्याने वाजवा.
७. ५०००० रुपयांच्या फटाक्याचा आवाजाचा आनंद लूटा.

खडे

पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ?  पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...