मुख्य सामग्रीवर वगळा

मुंबईवर अतिरेकी हल्ला.

काला रात्री पासुनचा मुंबईवरचा हल्ला बघून चिड येत आहे,
आम्ही आमचे काही मोहरे गमावून बसलो. आज घरी बसणार व उद्या परत कामावर, परवाची वाट बघत.
कधी पर्यंत असेच चालणार ?
गरज आहे पेटून उठायची या राजकारण्यां विरुद्ध.
साधा निषेध पुरेसा नाही.
उद्या तो अमर, लालू व सोनिया व असेच काही राजकारणी त्यांच्या भावंडांना का मारलं अस विचारण्या पुर्वीच व याची चौकशी करण्यात यावी हे म्हणण्या आधीच सांगुन टाकूया यांना घरी बसा अन्यथा पुढील निवडणुका आमच्या हातात आहेत.
असल्या राजकारण्यांना परत परत निवडून देणे म्हणजे अपमान आहे त्या शहिदांचा ज्यांनी या देशासाठी आपले प्राण वेचलेत.
करणार का त्यांचा अपमान वारंवार ?

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खानदेशी लाड !!!

खानदेशचे पती पत्नी मधील हे प्रेमळ संवाद ............. आमच्या पुढे जे ताटात येईल ते आम्ही जेवतो बाबा ......... पण इथे हे लाड बघा ...........   नवरा :- जेवाले काय बनावशी  ?
बायको :- तुम्ही सांगश्यात ते बनावसू..... !नवरा :- कर, वरण भात पोया...
बायको :- ते ते कालदिनच करेल व्हतं ...नवरा :- बेसण कर तावावरलं...
बायको :- पोरे खातस नई ना ते...नवरा :- वटाणास्नी चटणी कर...
बायको :- ती पचाले जड जास...नवरा :- तुले जे आवडस व्हई ते बानाव ...
बायको :- तुम्हीच सांगा ना, तुम्ही सांगश्यात ते बनावसू मी !नवरा :- आंडा कर मंग...
बायको :- काही वाटस का, सोम्मार शे आज...नवरा :- आरे हा, धिंडरा कर मंग...
बायको :- त्यासना भलता कुटाणा पुरस...नवरा :- तोरनी दायन्या चिखल्या बनाव..
बायको :- तोरनी दाय ते कालदिनच सरनी...नवरा :- मंग मॅगी बनाई टाक...
बायको :- हाट, ते का जेवण शे का?नवरा :- मंग काय बनावशी...
बायको :- तुम्ही सांगश्यात ते...नवरा :- आसं, कर खिचडीच बनाई टाक ...
बायको :- नको ,नुसती खिचडी खाई खाई कटाया येत नही  का?नवरा :- काय बनावशी मंग
बायको :- त्येच ते सांगी राहिनू, तुम्ही सांगश्यात ते बनावसू...नवरा :- आसं कर, …

उशिर.

मास्तर: काय रे पप्या , गण्या आज उशीर का
झाला तुम्हाला..?
.
गण्या : गुरुजी काल रात्री
स्वप्नात मी अमेरिकेला गेलेलो,
तिथून यायला उशीर झाला..
.
मास्तर: आणि पप्या तुला का रे उशीर झाला ??
.
पप्या : गुरुजी, मी गण्याला
आणायला एअरपोर्ट वर गेलेलो...
खुप धुतले राव मस्तरन😀😜😇😁😳😃

बदनाम !

आयला... नाव एवढा ख़राब झालाय की...उपवासाला चिवडा-वेफर आणायला गेलो तरी दुकानदार विचारतो...आजतरी उपवास धरा।।।
😂😂😂😂😂😂